HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

महाराष्ट्राला रोज ८ लाख लसींची गरज पण मिळतायत २५ हजार, आरोग्यमंत्र्यांची खंत

मुंबई | एकीकडे देशात लसीकरणाचा उत्सव केला जात असला तरी राज्यातील अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. अनेकांना रांगेत तासनतास उभे राहूनही लस मिळत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला ८ लाख दैनंदिन वॅक्सिनची गरज आहे, पण फक्त २५ हजार लसी मिळत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. सध्या राज्यात ८४.७ टक्के रिकव्हरी रेट आहे. तसेच राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा देशाचा रिकव्हरी रेट जास्त आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट २७ वरून २२ टक्क्यांवर आला आहे. ऑक्सिजन महत्त्वाचा विषय आहे. राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन नर्स नेमण्याचं आपण ठरवलं आहे.

तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजनचे लीकेज थांबवणे, प्लांटची तपासणी करण्याचं ठरवलं आहे. ऑक्सिजन जनरेटरच्या संदर्भात आपण १५० पेक्षा जास्त प्लांटची ऑर्डर दिलीय. तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वयंपूर्ण झालंच पाहिजे, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अधोरेखित केलंय.

२४ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटतेय, मात्र त्याचवेळी दुसरीकडे २४ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. राज्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. राज्यात रुग्णसंख्या हळूहळू घटत आहे. लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलंय. राज्यात रेमडेसिव्हीर साडेतीन लाखांपर्यंत उपलब्ध होतील. सध्या आपण ४० हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला २० हजार कॉन्सट्रेटर उपलब्ध होतील.

१ कोटी ६५ लाख नागरिकांना आपण लस दिली
लस हा एक महत्त्वाचा विषय आहे. ४५ वर्षे तसेच पुढील वय असलेल्या नागरिकांसाठी फक्त ३० हजार व्हॅक्सिन उपलब्ध होत्या. सध्या राज्यात ९ लाख डोस आले आहेत. त्यामुळे ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ते द्यायचे आहेत. राज्यात सर्व ठिकाणी ते वितरीत केले जातील.

रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट दिल्याशिवाय लसीकरणावर गर्दी करू नये, तरुणांना आवाहन

माझी महाराष्ट्रातील तरुणाईला विनंती आहे की, रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट दिल्याशिवाय लसीकरणावर गर्दी करू नये. मी एक खात्रीपूर्वक सांगतो की, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री तसेच सर्व मंत्र्यांचं मत हे एका चेकमध्ये लसी खरेदी करूयात असे आहे. मात्र, सध्या लसी उपलब्ध होत नाहीयेत. सध्या स्पुटनिक लससुद्धा आलेली आहे. त्याविषयी दर ठरवणे बाकी आहे. त्यानंतर ही लससुद्धा मिळेल. पुण्याचे अदर पूनावाला यांच्याशीसुद्धा चर्चा सुरू आहे.

ते विदेशातून परत आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. ग्लोबल टेंडरमधून अनेक देशांनी प्रतिसाद दिला आहे. ज्या देशांकडून आपल्याला ऑक्सिजन लवकर मिळेल, त्यांच्याकडून तो लवकर खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लिक्विड ऑक्सिजनसाठीसुद्धा काही ऑफर्स आल्या आहेत. त्याविषयी जसे निर्णय होतील ते कळवत राहू, असंही ते म्हणाले आहेत.

Related posts

पंतप्रधान ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अशी फक्त घोषणाच देतात !

Gauri Tilekar

“मराठा आरक्षणाचा खरा ‘टक्का’ कोण सांगेल आणि देईल?”, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल

News Desk

बंद लिफाफ्यातून सुचविली जाणार नव्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीची नावे

News Desk