HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 : परळीत धनंजय मुंडे विजयी, तर पंकजा मुंडे पराभूत

बीड | संपूर्ण राज्याचे लक्ष लागेल्या परळी मतदारसंघातील बहीण-भावामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अक्षेपार्ह वक्तव्य केल्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर मतदानाला अवघे एक दिवस शिल्लक असताना परळी मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. परळीत धनंजय मुंडे यांचा ३० हाजर ७६८ फरकारने विजयी झाले आहे. तर पंकजा मुंडेचा पराभव झाला आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून धनंजय मुंडेंनी आघाडी घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजमीला आज (२४ ऑक्टोबर) सुरुवात झाल्यापासून आघाडी घेतली आहे. तर धनंजय मुंडेला १ लाख २१ हजार १८६ मतांनी विजयी आघाडी घेतली आहे. तर पंकजा मुंडेला ९० हजार ४१८ मतांनी पराभव झाला आहे. “मतदारांनी दिलेला कौल मान्य, मात्र, निकाल अनाकलनीय असल्याची सांगत, मतदारांनी दिला कौल मान्य”, असल्याची प्रतिक्रिया परळीमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आपला आनंद व्यक्त करत थेट जेसीबीच्या लोडरमध्ये बसून गुलाल उधळला आहे. धनंजय मुंडे विजय आघाडी घेतली आहे.

मुंडे यांनी आकराव्या फेरीपर्यंत १८ हजार मतांनी विजयी आघाडी घेतली आहे. परळीतील निवडणूक बहीण- भावाने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि वडील गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या पंकजांची राजकीय प्रतिष्ठ पणाला लागलीय आहे. परळीत सोमवारी (२१ ऑक्टोबर) ७३ टक्के मतदान झाले होते. परळीत एकूण ३ लाख २०४ मतदारांपैकी २ लाख २३ हजार ३०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख ११ हजार ५४१ पुरुष तर १ लाख ३ हजार ७६९ स्री मतदारांनी मतदान केले आहे. एकूण ३३५ मतदान केंद्रावर मतदान झाले

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगदेवराव नाईक यांनी देहदान करून समाजाच्या नव्या पिढीसमोर आदर्श

News Desk

“प्रकाश आंबेडकरांनी सुट्टी का घेतली ?” ‘वंचित’ने जारी केले पत्रक

News Desk

नवाब मलिकांच्या राजीनाम्यांसाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांचे आंदोलन

Aprna