HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कलाकार, पण मला आपली कला शिकवत नाहीत !

मुंबई | ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील धुसफूस काही कोणापासून लपलेली नाही. याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली आहे. “आपण मुख्यमंत्री झालो नसतो, तर नक्कीच एक कलाकार झालो असतो. किंबहुना मी कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर टोला लागवताना राज्यपाल म्हणाले कि, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कलाकार आहेत. पण मला ते त्यांची कला शिकवत नाहीत. तुम्हाला मात्र कदाचित ते समूह विद्यापीठात येऊन त्यांची कला शिकवतील.” गेल्या अनेक दिवसांपासून भाजपची राज्यपालांशी असलेली जवळीक आणि ठाकरे सरकारशी असलेले मतभेद वाढत चालले आहेत.

ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये नुकताच ज्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे तो मुद्दा आहे राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम परीक्षासंदर्भातला. याच पार्श्वभूमीवर”सध्याच्या आपत्कालीन स्थितीत परीक्षा नव्हे तर शिक्षण सुरू राहणे आवश्यक आहे”, असे म्हणत यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर आणखी एक निशाणा साधला. राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी (११ जून) मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच. आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाकरेही उद्धव ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये ही टोलेबाजी पाहायला मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंचा ओबीसी व भटक्‍या विमुक्‍तांचा महामेळावा!

News Desk

दिवाळीनंतरच महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

News Desk

चीनचे आर्थिक कंबरडे मोडून काढणे हाच एक surgical strike आहे

News Desk