HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार

मुंबई | आज (९ डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होणार आहे. यात अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, दिशा कायदा राज्यात लागू करणे अशा काही महत्वांच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, १२ डिसेंबरला मुंबईत सगळ्यांसाठीच लोकल सुरु करता कधी येणार याबबात महत्वाची बैठक होणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ या नावाने राज्य सरकार नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

 

कोरोनामुळे राज्यातील दैनंदिन जीवन विस्कटले होते. ते आता हळूहळू रुळावर येताना दिसत आहे. त्यामुळे या अनुशंगाने आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.दरम्यान, या आधी १९ नोव्हेंबरला वाढी वीज बिलासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. दरम्यान, केंद्र सरकारची कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांशी आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आहे. हे सर्व प्रश्न कधी सुटणार शेतकऱ्यांना, मराठा समाजाला दिलासा कधी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू – देवेंद्र फडणवीस 

News Desk

संजय राऊत चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात – चंद्रकांत पाटील

News Desk

अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या शैलेश जोशींची आत्महत्या

News Desk