HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई | सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले आहे. महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. मात्र अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली होती. त्यानंतर महेश कोठे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे खुद्द शरद पवारांनीच ट्विट करत महेश कोठेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती दिली आहे.

महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर कोठे यांनी आज (८ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. महेश कोठे यांचे निकटवर्तीय समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. रियाज मुमिन, माजी नगरसेवक राज महेंद्र कमकम, युवराज चुंबडकर, सलाम शेख, युवराज सर्वडे, नितीन करवा, शाम पांचारिया, बाजू जमादार, परशुराम भिसे यांनी कोठेंबरोबर राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे एकत्र सत्तेत असून एकमेकांचे कार्यकर्ते फोडल्यास त्याचा वाईट संदेश जनतेत जाईल. त्यामुळे तिन्ही पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून असे पक्षप्रवेश रोखण्यात यावे, अशी सूचना शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती.त्यामुळे महेश कोठे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता होती, परंतु खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत आता कोठेंनी प्रवेश केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३ हजार कोटींची बेकायदेशीर उलाढाल करणाऱ्या मुंबईतील टॅंकर माफियांवर कारवाई करा! – आशिष शेलार

Aprna

मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

News Desk

“सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी मिळतात” – नितीन गडकरी

News Desk