HW News Marathi
महाराष्ट्र

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची केलेली मागणी भाजपाला मान्य आहे का? – महेश तपासे

मुंबई | मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मागणी भाजपाला मान्य आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे या मागणीवर महेश तपासे यांनी सडेतोड उत्तर देतानाच भाजपाला खडेबोल सुनावले आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई केंद्रशासित प्रदेश व्हावा ही मागणी मान्य आहे का? तुम्हाला मुंबई केंद्र शासित प्रदेश करायचा आहे का? याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करतानाच तुम्ही महाराष्ट्रासोबत असाल तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर देण्याची अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार”, फडणवीसांनी राऊतांना डिवचलं

News Desk

दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला

News Desk

दोन्ही छत्रपती जर एकत्र आले तर, महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होणार नाही

News Desk