HW News Marathi
Covid-19

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई | राज्य सरकारने आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (१ जून) याबाबतची माहिती दिली आहे. मराठी विषय सक्तीसंदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, हळूहळू हा निर्णय सर्व इयत्तांसाठी लागू होणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये हा मराठी विषय सक्तीबाबतचा निर्णय अंमलात आणण्यात येणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार, ‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१’मध्ये पहिली आणि सहावीसाठी, ‘शैक्षणिक वर्ष २०२१-२२’ मध्ये दुसरी आणि सातवीसाठी, ‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३’मध्ये तिसरी आणि आठवीसाठी, ‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४’मध्ये चौथी आणि नववीसाठी, तर ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५’मध्ये पाचवी आणि दहावीसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून देखील याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी तसेच केंब्रिज विद्यापीठांमध्ये मराठी हा विषय द्वितीय किंवा तृतीय भाषेसाठीचा पर्याय म्हणून उपलब्ध असतो. परंतु बऱ्याच शाळांमध्ये मराठी हा विषयच अभ्यासक्रमात नसल्याचे दिसून येते. राज्यातील मराठी वगळता इतर माध्यमांच्या शाळांमध्ये अन्य भाषांचे पर्याय उपलब्ध असल्याने मराठी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, आता राज्यातील विद्यमान ठाकरे सरकारडून राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, याची अंलबजावणी अर्थातच टप्प्याटप्प्याने होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद  

News Desk

विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण केली, योगी आदित्यनाथांचा आरोप

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध? उद्धव ठाकरे जनतेला आज संबोधित करणार

News Desk