HW News Marathi
महाराष्ट्र

अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल पण तसे घडले नाही !

बारामती | “अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल पण तसे घडले नाही,” असे म्हणत नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. पवार पुढे म्हणाले की, “पण राज्यातील जनतेने तसे होऊ दिले नाही.” शेतीच्या प्रगतीसाठी आणखी काम करत राहणार, ते यावेळी म्हणाले. “कृषी क्षेत्रात नवी संशोधन येत असेल, शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टी थांबवता कामा नये. शेतकऱ्याला संशोधन, नवीन प्रयोग करण्यास सरकारने प्रोत्साहन द्यावे,” अशी इच्छाही शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे आज (१६ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख या सोहळ्याला उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे बारामतीत जाहीर कार्यक्रमला हजर राहिले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूबाबत घडलेल्या घडामोडी अत्यंत क्लेशदायक – उज्वल निकम

News Desk

मंत्रालयासमोर सरकारी कर्मचा-याचा आत्मदहनचा प्रयत्न

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची नियमानुसार कारवाई होणार – अनिल देशमुख

News Desk