HW News Marathi
महाराष्ट्र

वादग्रस्त बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांची बदली!

बीड । बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे वादग्रस्त ठरलेले बीडचे एसपी आर राजा यांची अखेर बदली झाली आहे.पुणे येथे उपायुक्त म्हणून आर राजा यांची नियुक्ती देण्यात आली आहे.

बीडचे आमदार संदिप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह आ विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर त्यांच्या जागी नवीन एसपी कोण येणार याबाबत चर्चा सुरू होती.दरम्यान आर राजा यांची पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय भूकंप, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

News Desk

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

News Desk