HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

वैद्यकीय प्रवेशावरून नाराज मराठा विद्यार्थ्यांना चर्चेतून तोडगा काढण्याचे आश्वासन

मुंबई | मराठा समाजातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज (१३ मे) सातवा दिवस आहे. या आंदोलनकारी विद्यार्थ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिंडळ पक्षनेते अजित पवार यांनी  भेट घेतली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे.

आम्ही सरकारला याबाबत मदत करत असून लवकरात लवकर कसा तोडगा निघेल यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. जर अध्यादेश काढून प्रश्न सुटत असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत आचारसंहितेचे कारण पुढे आले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत आज चर्चा करुन लवकर हा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची काल (१२ मे) मुंबई येथे बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय  पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे मराठा समाजामध्ये नाराज आहेत. या बैठकीमध्ये या मराठा डॉक्टर्स विद्यार्थ्यांच्या मागे पूर्ण मराठा समाज ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

 

Related posts

लोकसभेत विरोधकांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण !

News Desk

शिवशाहीच्या तिकीट दरांमध्ये कपात, १३ फेब्रुवारीपासून नवे दर लागू

News Desk

नागपूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

News Desk