HW News Marathi
महाराष्ट्र

जालन्यात मराठा समाजाचे आमदार, खासदारांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन

जालना | मराठा आरक्षणासाठी समाज आता आक्रमक होत चालला आहे. मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेले आंदोलन राज्यात अनेक ठिकाणी सुरूच आहे. या आंदोलकांनी केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ढोलताशा वाजवत थाळीनाद आंदोलन केलं. आंदोलकांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री, जयंत पाटील, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या घरासमोरही थाळीनाद करून आरक्षणाची मागणी केली. दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनीही आंदोलनात भाग घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज (२ ऑोक्टोबर) जालन्यात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवून थाळीनादही केला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं आणि एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाणांना आतापासून मुख्यमंत्रपद देण्याचा कार्यकर्त्यांचा खटाटोप

swarit

सरकारची दडपशाही व पोलिसांचा दहशतवाद त्वरीत बंद करा – अॅड. डॉ. सुरेश माने

News Desk

आठवलेंचे स्वप्न भंगले; भाजपने निवडले दोन साथीदार!

News Desk