HW News Marathi
महाराष्ट्र

मराठवाडा-विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

नागपूर | मराठवाडा-विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नागपूर-मुंबई महामार्ग रोखला आहे. भाजप आमदार आशिष देशमुखांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. अमरावती-नागपूर महामार्गावरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामा करण्याचे आदेश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. तसेच काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे देखील विदर्भातील गावांना भेट देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणार नाही !

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात २ जण पोलीसांच्या ताब्यात

News Desk

…म्हणून नारायण राणेंनी भाजपमध्ये पळ काढला, शिवसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk