मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (४ एप्रिल) जनतेशी संवाद साधला. अजूनही देशात कोरोनामूळे सुरु असलेल्या लॉकडाऊनला लोकांनी गांभीर्याने घेतले नाही आहे त्यासाठी त्यांनी खंत व्यक्त केली. कोरोनाच्या या संकटात सर्व अत्यावश्यक सेवा, डॉक्टर, पोलीस, पाणी पुरवठा करमारे कामगार, वीज पुरवणारे कामगार, सर्व सरकारी कर्मचारी सामान्य लोकांसाठीच जीव धोक्यात घालून दिवसरात्र काम करत आहेत. अशातच जर पोलीसांवर लोकांनी हात उगारला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
तसेच, कोरोनाच्या या काळात घराघरांत डॉक्टर तयार होतात असा टोलाही त्यांनी लगावला. कोणी लसूण खा, कांदा खा असे अनेक सल्ले देतात. पण दिवसरात्र तिथे डॉक्टर मेहनत करत आहेत त्यांचे काय असा प्रश्नही त्यानी उपस्थित केला. मरकज येथे तब्लिगी समाजाच्या झालेल्या कार्यक्रमावर अत्यंत संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला. मरकजवाल्या लोकांना उपचार न देता त्यांना गोळ्या घालून मारायला हवे अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी दिली. जर धर्माच्या नावाखाली मुस्लिम असं काही करत असतील तर त्यांनी एक लक्षात ठेवावे की लॉकडाऊन हा काही दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोत अशी चेतावनीही यावेळी राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरेंच्या लाईव्ह परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- लॉकडाऊन लोकांनी गांभीर्याने घ्यावा : राज ठाकरे
- दिवे लावून परिणाम होणार असेल तर लावावेत मोदींच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता : राज ठाकरे
- लोकांमधील संभ्रम सरकराने दूर करावा : राज ठाकरे
- कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करण्याऱ्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे
- लॉकडाऊन गांभीर्याने घ्या, राज ठाकरेंचं जनतेला आवाहन ‘गुन्हे दाखल करून काही होणार नाही’
- हे जे मुल्ला-मौलवी कुठे आहेत ते बघायचं आहे, निवडणुकीवेळी कुणाला मतदान करायचं सांगता, मग अशावेळी तुम्हाला सांगता येत नाही का? – राज ठाकरे
- माध्यमांचंही अभिनंदन आणि आभार, पत्रकार सर्वत्र फिरून बातम्या गोळा करत आहेत, मात्र त्यांनाही कुटुंब आहे – राज ठाकरे
- पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करणं योग्य नाही, पोलिसांकडून चुका होऊ शकतात, मात्र ही वेळ नाही – राज ठाकरे
- हात जोडून विनंती आहे, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल – राज ठाकरे
- नुसता केसेस टाकून उपयोग नाही, त्यांना फोडून काढलं पाहिजे आणि त्यांचे व्हिडीओ समोर आले पाहिजेत – राज ठाकरे
- या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजे, तुम्हाला कुटुंब आहेत की नाही? तुमच्याही अंगलट येईल – राज ठाकरे
- समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवं – राज ठाकरे
- -लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे – राज ठाकरे
- भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे, त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत – राज ठाकरे
- पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता – राज ठाकरे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.