HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मार्मिक लवकरच डिजिटल रुपात आपल्या भेटीला येणार – उद्धव ठाकरे

मुंबई | इतिहास बंदुका आणि तलवारीच्या मदतीने घडतात. मात्र कुंचल्याच्या सामर्थ्याने इतिहास घडवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे एकमेव होते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मार्मिकचा जन्म हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने झाला. अजूनही कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आपल्यात आलेला नाही. त्यामुळे तो लढा सुरुच आहे. मार्मिक हे जगातलं पहिलं साप्ताहिक आहे ज्या साप्ताहिकाने आपला हिरक महोत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा केला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

सध्या ऑनलाइनचं युग आहे. मार्मिकही लवकरच डिजिटल अर्थात ऑनलाइन रुपात आपल्या भेटीला येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबई महाराष्ट्राने मिळवली होती ही आठवणही उद्धव ठाकरेंनी सांगितली. मराठी माणूस हा अन्याय करणार नाही, मात्र जो आपल्यावर अन्याय करेल त्याला आपण सोडणार नाही ही आपली वृत्ती आहे ही अशीच असली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी सामर्थ्य दाखवलं ते त्यांच्या कुंचल्यावरचं सामर्थ्य होतं. त्या कुंचल्याचे फटकारे अनेकांना बसले आहेत. मराठी माणसाने लढा दिलाय. मुंबई मिळवली आहे. मुंबईकरांना आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हे मार्मिक सुरु झालं असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Related posts

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केंद्राचे काम तातडीने पूर्ण करा -अजित पवार

News Desk

मरोळमध्ये माकडांचा उच्छाद, नव्या पाहुण्यांमुळे रहिवाशी झाले त्रस्त

News Desk

दारूची दुकाने खुली मात्र जिम बंद, हे दुर्दैवी ! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk