मुंबई | गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. काल (९ फेब्रुवारी) तळोजा एमआयडीसीत असलेल्या एका रासायनिक कारखान्याला आग लागली होती. ही घटना ताजी असताना आज (१० फेब्रुवारी) पुन्हा एकदा मुंबई-वर्सोवा येथे सिलेंडरच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
सिलेंडर गोदामाला आग लागल्यामुळे परिसरात स्फोटांचे मोठे आवाज होत आ आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटामुळे परिसरात मोठा आवाज झाला. तसेच, यात ४ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमींवर मुंबईच्या कुपर रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
Mumbai: Four people injured in a cylinder blast at a cylinder storage godown on Yari Road in Andheri (W); all injured shifted to a city hospital
— ANI (@ANI) February 10, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.