HW News Marathi
महाराष्ट्र

‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मोठया प्रमाणात राबवा – मुख्यमंत्री

मुंबई | कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स केला
  • सर्व जिल्ह्यांत स्थानिक तज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले
  • लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स
  • दोन्ही टास्क फोर्समध्ये वैद्यकीय उपचारासंदर्भात सतत संवाद
  • सर्व खासगी डॉक्टर्सना सहभागी करून व्याप्ती वाढविण्यासाठी ऑनलाईन वैद्यकीय परिषदांचे आयोजन
  • मुंबईतील १ हजार फॅमिली डॉक्टर्स, जनरल फिजिशियन यांच्याशी संवाद
  • राज्यभरातील १७ हजार फॅमिली डॉक्टर्स, जनरल फिजिशियन यांच्याशी संवाद
  • राज्यभरातील ६ हजार बाल रोग तज्ञांशी संवाद
  • महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या माध्यमातून २१ हजार ५०० डॉक्टर्सची परिषद
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारकडून मंत्र्यांची प्रकरणं दाबली जातात, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

News Desk

मंदिर उघडल्यावर संक्रमण वाढले तर पुन्हा सरकारलाच दोष देणार- संजय राऊत

swarit

राम मंदिराच्या पायभरणीचा सोहळा दिवाळीसारखा साजरा करावा मात्र कोरोनाचे भान ठेवावे – चंद्रकांत पाटील

News Desk