HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा कशी घेता येणार असा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याबाबचा निर्णय घेण्यात आल्या आहेत. यानुसार या वैद्यकीय परीक्षा जून महिन्यात घेण्यात येतील, असेही अमित देशमुख म्हणाले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. या चर्चेनंतर या परीक्षा जून महिन्यात घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

अमित देशमुख यांनी ट्विट करत दिली माहिती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आणि राज्याचे गृहमंत्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव विसरले!

News Desk

महाराजांमुळेच महाराष्ट्राला इतिहास, बाकी इतर प्रांतांना फक्त भुगोल! – संजय राऊत

Aprna

‘आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार’, शरद पवारांचं स्पष्टीकरण

News Desk