HW News Marathi
महाराष्ट्र

मी खूप पुढे आलोय. तुम्ही साथ सोडू नका

सिंधुदुर्ग: कॉँग्रेस प्रदेशाध्य अशोक चव्हाण, मोहन प्रकाश राज्यात काँग्रेस संपवत असून त्यांना मी काय आहे, हे अजून समजलेच नाही. मला डिवचले की माझी ताकद दुप्पट होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले. मी खूप पुढे आलोय, फक्त आता तुम्ही साथ सोडू नका असे भावनिक आवाहन त्यांनी समर्थकांना केले.

भाजपच्या वाटेवर असलेले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे कुडाळमध्ये पोहोचले. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांचा स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केल्याचे समोर आले होते. यानंतर काँग्रेसने शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली होती. सोमवारी नारायण राणेंनी काँग्रेसच्या या निर्णयावर चौफेर टीका केली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय नियमबाह्य असून माझ्या संमतीशिवाय प्रदेश काँग्रेस निर्णय घेऊ शकत नाही, असे राणेंनी म्हटले आहे. नारायण राणे नाराज असल्याच्या बातम्या येत असतानाही काँग्रेसचा एकही नेता माज्याशी बोलला नाही. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करताना कोणीच विचारलं नाही असा दावा त्यांनी केला. राज्यात काँग्रेसचे सर्वात चांगलं काम सिंधुदुर्गमध्ये असून नांदेडमध्येही अशी स्थिती नसल्याचे ते म्हणालेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचं पॅनल उतरवणार असून समर्थ विकास पॅनल निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर कार्यकर्त्यांनी ह्यनारायण राणे आगे बढो अशा घोषणा दिल्या. यावर राणे म्हणाले, ह्यमी खूप पुढे आलोयं. फक्त आता तुम्ही साथ सोडू नका.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मे महिन्यात ‘एप्रिल फूल’!, पेट्रोल-डिझेल दरकपातीवरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Manasi Devkar

कोणतीही भाषा नुसती ओठातून येवून उपयोग नाही तर ती पोटातून आली पाहिजे! – अजित पवार

Aprna

मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – वरुण सरदेसाई

News Desk