HW News Marathi
Covid-19

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 जूनपासून!

मुंबई | राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या 2 जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज(१९ मे) दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या तर काही रद्द करण्यात आल्या होत्या.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वैद्यकीय पदवी परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या परीक्षांचा समावेश असणार?

या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये, १४ दिवसांच्या क्वॉरंटाईन काळानंतर कामकाजाला केली सुरुवात

News Desk

आज मशिद उघडून नमाज करणार ! मंदिरांनंतर आता इम्तियाज जलील यांचा मशिदीकडे मोर्चा…

News Desk

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश होरपळला आता तिसरी आणि चौथी लाटही येणार!

News Desk