HW News Marathi
महाराष्ट्र

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला!

मुंबई | विरोधकांवर, आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून केला आहे. टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर आणि पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचा बळी ठरल्याने सामनात याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

“पुण्यात टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर या तरुण पत्रकाराला वेळीच रुग्णवाहिका न मिळाल्याने दिरंगाईत प्राण गमवावा लागला. रायकर यांच्या मृत्यूने पत्रकारांमध्ये चीड आणि संताप निर्माण होणं साहजिक आहे. इतक्या ओळखीपाळखी असतानाही पत्रकार आपल्या सहकाऱ्यास वेळेवर मदत करु शकले नाहीत, तेथे इतर सामान्य लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.”

तसेच कोरोना काळात पुरेशा आरोग्य व्यवस्था नसण्याला फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. अग्रलेखात म्हटलं आहे, “वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी भरती आणि सुविधा योग्य निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आली असती. गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज तात्पुरत्या जम्बो सुविधा उभारण्याची गरज कमी लागली असती.”

“विरोधी पक्षांच्या टीकेचा आरोपांचा मुख्य भर जम्बो कोव्हिड केंद्रावर आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही,” असंही यात नमूद करण्यात आलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिंदे-फडणवीसांनी हा महाराष्ट्रद्रोह थांबवावा”, नाना पटोलेंची टीका

Aprna

आम्ही तुमची वाट बघतोय! नितेश राणेंचं शिवसैनिकांना आव्हान

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna