HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

महानगरपालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा उद्यापासून बंद

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय ‘ऑल फूड अँड लायसन्स होल्डर फाऊंडेशन’ने घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (२७ जून) एकूण ४४ औषध पुरवठादार कंपन्यांकडून महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. महानगरपालिकेकडून काहीच दिवसांपूर्वी औषध पुरवठादारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते. याप्रकरणी टेंडरचे सर्व नियम पाळूनही या औषध पुरवठादार कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केल्याचा आरोप ‘ऑल फूड अँड लायसन्स होल्डर फाऊंडेशन’ने केला आहे. त्यामुळे, या फाऊंडेशनने मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेडिको प्रा.लि. या औषध पुरवठादार कंपनीने उशिराने औषध पुरवठा केला. त्याप्रकरणी १५ लाखांचा दंड भरूनही तसेच टेंडरचे सर्व नियम पाळूनही पुरवठादार कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले, असे म्हणत ‘ऑल फूड अँड लायसन्स होल्डर फाऊंडेशन’ने महानगरपालिकेवर आरोप केले आहेत. याप्रकरणी, या फाऊंडेशनने महापालिका आयुक्तांची भेट देखील घेतली. मात्र, काहीही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे, या औषध पुरवठादार कंपन्यांनी पालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पुरवठादार कंपन्यांच्या या निर्णयामुळे रुग्णांचे मात्र मोठे हाल होणार आहेत.

Related posts

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

News Desk

“किल्ला पडलेला का आहे? पूर्वी किल्ला कसा दिसायचा?”

News Desk

सर्वण आरक्षणाचा लाभ घेण्यापूर्वी ‘या’ अटी जाणून घ्या 

News Desk