धुळे | काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता राष्ट्रवादीने सदाभाऊ खोत यांनाच सुनावले आहे.आपण ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवल्याचा टोला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लगावला. सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे, त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही, अशा शब्दात शेख यांनी निशाणा साधला आहे.
सदाभाऊ खोत हे कोणाच्या बाबतीत बोलतात, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काळात क्रिकेटचे २०-२० चे सामने सुरु झाले. पवार साहेबांच्या कार्यकाळात वर्ल्ड कप सुरु झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तरी गाव पातळीवर खेळले आहेत, असंही मेहबूब शेख म्हणाले आहेत.
पवार साहेबांनी या वयात कुस्ती खेळणे यांना अपेक्षित आहे का आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. आपण ज्या नर्सरीत शिकता, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब आहेत, हे सिद्ध करुन दाखवल्याचं मेहबूब शेख म्हणाले आहेत.
सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे. त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही. सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, ते काहीही बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.