HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव भिमा शौर्य दिनी मिलिंद एकबोटे-संभाजी भिडेंना पुणे जिल्हाबंदी

पुणे | कोरेगाव भिमामधील शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि हिंदु एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. भिडे आणि एकबोटे यांना २८ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पुणे जिल्हाबंदी घालण्यात आली आहे. १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक कोरेगाव-भीमा या ठिकाणी येत असतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा, या पार्श्वभूमीवर नियोजन जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा या ठिकाणी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून आदेश काढण्यात येणार आहे. एकबोटे आणि भिडे यांच्यासह एकूण १६३ जणांना पुण्यात बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली काल (२२ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने आढावा घेण्यात आला. भिडे आणि एकबोटेना जिल्हा बंदी करण्यात येणार आसल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची माहिती दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्र मॉडेल आहे की, मृत्यूचा सापळा’, फडणवीसांचा सवाल

News Desk

कोल्हापूर विमानतळच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा! – ज्योतिरादित्य सिंधिया

Aprna

आदिवासी संस्कृतीचे जतन करून विकासकामे करावीत, मुख्यमंत्र्यांचे आदेश!

News Desk