HW News Marathi
Covid-19

वडिलांनी लस घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मार्च) सकाळी जेजे रुग्णालय येथे जाऊन कोरोना लस घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी लस घेतल्यानंतर त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जे पात्र आहेत त्यांनी लस टोचून घेण्याचं आवाहन केलं.

वडीलांनी लस घेतल्यानंतर आदित्य यांनी ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे तसेच सर्व पात्र व्यक्तींने पुढे येऊन लस घ्यावी असं आवाहन केलं. “जे जे लस घेऊ शकतात आणि पात्र आहेत त्या जास्तीत जास्त लोकांनी ही लस घेतली पाहिजे. जगभरामध्ये आपण पाहतोय की लस घेतल्यानंतर कोरोनाचे दुष्परीणाम कमी होऊन या संसर्गापासून सुरक्षा मिळत आहे,” असं आदित्य यांनी म्हटलं आहे. तसेच पत्रकारांनी मास्क घातल्याबद्दल समाधान व्यक्त करताना अशापद्धतीने मास्क घातल्यास प्रादुर्भाव थांबवून आपण सुरक्षित राहू शकतो असंही आदित्य म्हणाले.

लस घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.” पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनसंदर्भातील इशाराही दिला आहे. “काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी वारीचे स्वरुप कसे असणार यावर आज चर्चा होणार

News Desk

बिल गेट्स यांनी मोदींचे आभार का मानले ?

News Desk

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सुरुवात गुजरातपासून !

News Desk