HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही मराठवाड्याचे भगीरथ व्हा, आम्ही सत्कार नाही दंडवत घालू – धनंजय मुंडे

औरंगाबाद | “विविध योजना आहेत, प्रकल्प आहेत ते येत्या काळात पूर्ण होतील आणि मराठवाड्याला अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु मराठवाड्यात पाण्याची मोठी कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी आहे”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
मराठवाड्याकरीता मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९.२९ टीएमसी व पैनगंगा उपखोऱ्यात मराठवाडा व विदर्भाकरीता ४४.५४ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन मधल्या काळात महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने केले. याबाबत मराठवाडा अभियंता मित्र मंडळ, औरंगाबादच्यावतीने रविवारी (२८ नोव्हेंबर) जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर यांचा सत्कार करण्यात आला.

…तर आम्ही दंडवत घालू – धनंजय मुंडे

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, “गोदावरी उपखोऱ्यात १९.२९ टीएमसी व पैनगंगा उपखोऱ्यात ४४.५४ टीएमसी पाणी उपलब्ध करून देऊन आपण मराठवाड्यासाठी भगीरथ ठरला आहात. या दोनही निर्णयांची अंमलबजावणी झाल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक रखडडलेल्या प्रकल्पांना पाणी उपलब्धी प्रमाणपत्र मिळून प्रकल्प मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.”
पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, “सतत अवर्षण तर कधी अतिवृष्टीने ग्रस्त मराठवाड्यात कष्टकरी लोक आहेत. मागल्या व आमच्या पिढीने दुष्काळ व स्थलांतर पाहिले पण पुढच्या पिढीला ते नशिबी येऊ नये यासाठी इथे पश्चिम महाराष्ट्रचया बरोबरीने जलगंगा उपलब्ध झाली तर ऊसतोड कामगारांसह विविध कामांसाठीचे स्थलांतर कायमचे बंद होईल.”
“मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्र, कोकण कुठूनही पाणी उपलब्ध करा, जमिनीच्या खालून किंवा वरून कोणत्याही पद्धतीने द्या, पण पाणी द्या व ते दिल्याने भगीरथ ही उपाधी सार्थ ठरेल. आम्ही मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यासाठी आपल्याला दंडवत घालू एवढेच नव्हे तर सबंध मराठवाड्यातील जनता आपला गौरव करेल”, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?

News Desk

ग्रामपंचायत निवडणूक: बिनविरोध निवडणुकीत शिवसेनेनं मारली बाजी

News Desk

अतुल भातखळकरांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आवाज उठवल्याने आले धमकीचे फोन  

News Desk