परळी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचा ८० वा वाढदिवस परळीत धनंजय मुंडे व अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते ८१ किलोचा केक कापून केला साजरा. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळी मतदारसंघात शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करत असल्याचे कारण आहे. याचे कारण तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला म्हणून आज हा धनंजय मुंडे एवढा मोठा झाला. मी तुमचा वाढदिवस हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणले.
धनंजय पुढे असे म्हणाले की, “१९९९ साली गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यावेळी गोविंदा परळीत आले होते. त्यावेळी गोविंदा मला म्हणले होते की धनु तुम जिंदागिमे बहोत आगे बढोगे. २१ वर्षांनी मी आज या ठिकाणी आहे. यासाठी गोविंदा चेही आभार मानण्यासाठी मी त्यांना आज परळीत आणले आहे.”
धनंजय मुंडे म्हणाले की, मी अद्याप देव पहिला नाही पण मी शरद पवार साहेबांमध्ये देव पाहतो. म्हणून मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहे. या परळीच्या जनतेने मला २० हजार मताच्या आघाडी दिली आणि जिंकवले. त्या परळीच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मी आज उभा आहे. मी निवडणुकीत जे जे शब्द दिलेत ते ते येणाऱ्या काळात पूर्ण करणार”, असे आश्वासनही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.