HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“ट्रम्प ठिके पण माधुरी दिक्षितसोबत माझी तुलना का ?”, मुश्रीफांचा फडणवीसांना सवाल

मुंबई । “माझ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना नट-नट्या कशा सुचतात. माधुरी दीक्षित यांच्यासोबत माझी तुलना कशी करता येईल. ट्रम्प यांच्यासोबत नाव जोडल्याबद्दल आभारी आहे. पण एका महिलेशी तुलना कशी करता?” असा सवाल राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेनंतर उपस्थित केला आहे. तसेच, “ट्रम्प यांच्याबरोबर आणखी एका लोकप्रिय नेत्यांचं नाव जोडलं असतं तर चाललं असतं”, असाही टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस बिकट होते आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून जुंपत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारवर निशाणा साधत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टीका केली होती.त्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पियुष गोयल यांच्यावर टीका केली होती. ह्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक झडताना पाहायला मिळत आहे.

फडणवीस मुश्रीफांना काय म्हणाले ?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हसन मुश्रीफ म्हणजे काही माधुरी दिक्षीत किंवा ट्रम्प नाहीत. त्यांना महाराष्ट्रबाहेर कुणीही ओळखत नाही. पियुष गोयल यांच्यावर हसन मुश्रीफांनी टीका करणं चुकीचं आहे.”

मुश्रीफ काय म्हणाले होते?

हसन मुश्रीफ म्हणाले होते की, “पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकं तरी ओळखतात का?”, असा खोचक सवाल हसन मुश्रीफ यांनी विचारला होता.

Related posts

शशी थरूर यांचे हे विधान हिंदू धर्माचा जाणूनबुजून केलेला अपमानच !

News Desk

कोरोना लसीकारणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा-राजेश टोपे

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांना वाहिली श्रद्धांजली

News Desk