HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री जयंत पाटील यांची लाँग ड्राईव्ह आणि युवा टीमशी चर्चा… मध्यरात्री स्वतःच स्टिअरिंग हातात घेत केला प्रवास !

यवतमाळ | राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात दिवसभर पक्षाचा आढावा… सभा, बैठका आणि पुन्हा प्रवासात पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा दिनक्रम असताना सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं… त्यांना मार्गदर्शन करता यावं…म्हणून चक्क प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यरात्री स्वतः गाडीचे स्टेअरिंग हातात घेऊन युवा पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानानिमित्ताने दौर्‍यावर आहेत

हे सगळे दिवसभर सोबत असले तरी त्यांच्याशी पक्षाच्या बांधणीबाबत नीट चर्चा करता येत नसल्याचे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३.१७ असा जवळपास अडीच तासाची स्वतः ड्रायव्हिंग करत चर्चा केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या चांगल्या वागणूकीने युवा टीम प्रभावित झाली आणि त्यांनी त्यांना आलेला अविस्मरणीय क्षण सोशल मीडिया साईट्सवर शेअर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

News Desk

‘मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार’ – आशिष शेलार

News Desk

अशोक चव्हाणांना ‘त्या’ पदावरून हटवा !, विनायक मेटे आक्रमक

News Desk