HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कुणी कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही, पाऊसही पडणार नाही !

मुंबई | “कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही”, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.

भाजपचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत अपशब्द वापरत आहेत. आणि एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत करत आहेत हे बोलणं योग्य नाही असे नवाब मलिक म्हणाले. सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा प्रयोग केला पाहिजे असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला आहे.

Related posts

मोदींची सिंगापुर येथील मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड | राहुल गांधी

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

#Lockdown5 : ‘या’ गोष्टींना केंद्राकडून परवानगी मात्र राज्याचे निर्बंध कायमच

News Desk