मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गंभीर आरोपांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. “फडणवीसांचे फटाके भिजलेले होते, वाजलेच नाही. पण आता मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार” असा मोठा इशारा मलिकांनी मंगळवारीच (९ नोव्हेंबर) दिला. याच पार्श्वभूमीवर, आज (१० नोव्हेंबर) सकाळी १० वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यातच आता मलिकांनी एक सूचक ट्विट केलंय.
मलिकांचा हा हायड्रोजन बॉम्ब नेमका काय असणार? याबाबतची चर्चा गेल्या दिवसभरात राज्यात चांगलीच रंगू लागलेली असताना आता मलिकांनी एक सूचक ट्विट केलंय. “उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, मिलते है आज सुबह १० बजे”, असं ट्विट करत नवाब मलिकांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या काहीच तासांपूर्वी फडणवीसांना पुन्हा इशारा दिला आहे. त्यामुळे, आता लक्ष या पत्रकार परिषदेकडे आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी नवाब मलिकांवर जमीन खरेदी गैरव्यवहाराचा एक गंभीर आरोप केला. “मलिकांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून कवडीमोल दराने साधारणतः ३ एकराची एकर जमीन विकत घेतली”, असा दावा फडणवीसांनी केला. या आरोपाला मलिकांनीही प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार असं मलिक म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.