HW News Marathi
देश / विदेश

देशात १४७ कोरोना बाधित, राज्यात एकूण रुग्ण संख्या ४२ वर

मुंबई | जगभरात थैमाल घालणाऱ्या कोरोना वायरसने भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४७ वर गेली आहे. तर महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात ४१ रुग्ण संख्या असून यात ३८ भारतीय, ३ परदेशी पर्यटक तर १ ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल (१७ मार्च) दिली आहे.

दरम्यान, मृत झालेला जेष्ठ नागरिक हा ५ मार्चला दुबईहून आला होता. त्या नागरिकास उच्च रक्तदाबाचा त्रास असलेला हा रुग्ण हिंदूजा रुग्णालयातून संदर्भित करण्यात आला होता. या जेष्ठ रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाचा मृत्यू नेमका कोरोनानी झाला का याचे माहिती त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर कळणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्यात काल (१७ मार्च) पुणे आणि मुंबईत प्रत्येक १ रुग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबईचा असून हा ४९ वर्षाचा तरुण ७ मार्च रोजी अमेरिकेवरुन परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा २६ वर्षीय तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे.

राज्यात काल १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ११६९ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात कालपर्यंत ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ११६९ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. दरम्यान, काल आणि आज राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्था नवी दिल्ली येथील तज्ञ पथकाने पुणे येथे भेट देऊन येथील कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्यातील कोरोना रुग्णांची अशी आहे संख्या

 

  • पुणे -१८,
  • मुंबई – ७,
  • नागपूर – ४,
  • यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण – प्रत्येकी ३,
  • रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद – प्रत्येकी १
  • एकूण ४२

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

Aprna

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; रुग्णालयात दाखल

Aprna

रोहिंग्यांना परत पाठविण्यास रोखण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Gauri Tilekar