HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार अमित साटम यांचा अस्लम शेख व महापौर पेडणकरांवर आरोप

मुंबई | पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरातील एका क्रीडा मैदान उभारण्यात आले. मात्र, या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देण्यात आल्यामुळे सध्या या नावावरून राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून भाजप आमदार अमित साटम यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

अमित साटम यांनी या पत्रात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालकमंत्री अस्लम शेख यांचा यात उल्लेख केला आहे. किशोरी पेडेणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरत आहेत असा आरोप अमित साटम यांनी केला आहे.

अमित साटम यांचं पत्र


मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थितीमध्ये होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच मी समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या महापौर किशोरी पेडेणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरतायेत.

वास्तविकतेत जर टिपू सुलताना नामफलक अवैध असले तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालकमंत्र्यांच्या बचाव कार्यातच त्या मग्न आहेत. धक्कादयाक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालकमंत्री अस्लम अवैधरित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधत आहेत, इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करत आहेत.

आपणास नम्र विनंती आहे की, यावर आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे, ही विनंती, असं साटम यांनी या पत्रात म्हंटलं आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने…रूपांतर हाणामारीत!

News Desk

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, चित्रा वाघ पुन्हा एकदा कडाडल्या!

News Desk

PandharpurElection : आघाडी पिछाडीचा खेळ सुरुच, समाधान आवताडे ८व्या फेरी अखेर आघडीवर!

News Desk