HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे मुंबई, पुण्यातील २ मेळावे अचानक रद्द; कारण काय?

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागल्याचं बोललं जातं असतानाच मनसेने आपले २ मळावे अचानक रद्द केल्याचं वृत्त समोर येत आहे. उद्या म्हणजे २३ ऑक्टोबरला मुंबईत तर शनिवारी (२४ ऑक्टोबर) पुण्यात होणारे हे दोन्ही मेळावे मनसेकडून अचानक रद्द करण्यात आले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून अधिकृतपणे मनसेने याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, यावेळी पक्षाकडून आपले मेळावे रद्द करण्यामागचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देताना लिहिण्यात आलं आहे की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार दि.२३/१०/२०२१ रोजी मुंबईत, तर दि.२४/१०/२०२१ रोजी पुणे येथे होणारा शाखा अध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.” मात्र, सगळी तयारी पूर्ण झालेली असताना हे मेळावे अचानक रद्द होण्याचं नेमकं कारण काय? याबाबत चर्चा रंगत आहेत.

मेळावे रद्द, कार्यकर्त्यांचा हिरमोड

माहितीनुसार, राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने हे मेळावे रद्द झाल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर येत्या निवडणुकांमध्ये मनसेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत सर्वत्र बोललं जात आहे. निवडणुकांसाठीची रणनीती, भाजपसोबत युतीच्या चर्चा रंगत होत्या. राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, हे मेळावे रद्द झाल्याचे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचं सांगितलं जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध’, राज्यपालांचं आश्वासन

News Desk

हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये, राऊतांचा विरोधकांना सल्ला  

News Desk

विलासरावांनी महाराष्ट्रातल्या दूधाचा प्रश्न अमेरिकेतुन सोडवला होता !

News Desk