HW News Marathi
महाराष्ट्र

जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप आमच्यासोबत आली तर स्वागतच, मनसेची बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

मुंबई | वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं माजी उर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी मनापासून अभिनंदन केेले आहे. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी केली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच बावनकुळे यांनी हे विधान केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेत वेगळीच खिचडी शिजत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे मोठं विधान केलं. वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, असं विधान बावनकुळे यांनी केलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान, यावरच मनसेची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एच.डबल्यू मराठीशी बातचीत करताना भाजप मनसे एकत्र येणार का यावर भाष्य केले आहे. “वीज बिलासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बातचीत करणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून पुढचा निर्णय घेतला जाईल. जनतेला दिलासा देण्यासाठी काय करु शकतो हे आजच्या बैठकीत ठरवू. तर माजी उर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेला साथ देऊ या वक्तव्यावर मनसे सरचीटणीस संदीप देशपांडे असं म्हणाले की, जनतेला दिलासा देण्यासाठी विरोधी पक्षंनी एकत्र काम केले तर त्यात वाईट काय आहे. आणि जर भाजपने या वीज बिलाच्या संदर्भातील लढ्यात भाग घेतला तर त्यांचे स्वागतच असेल”, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोठ्या कडून नाही पण धाकट्या कडून अपेक्षा आहेत..” , तेजस ठाकरेंच्या प्रवेशावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

News Desk

लॉकडाऊनमध्ये काळात राज्यात सायबरचे २२७ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

तरूणीवर सामुहिक बलात्कार, बलात्कार प्रकरणी तीन तरूणींना अटक

News Desk