HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदारसंघातून ‘मनसे’कडून रुपाली ठोंबरे-पाटील यांना उमेदवारी जाहीर

पुणे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून महिला अध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, खरंतर रुपाली पाटील यांना पक्षाकडून विधानसभेकरिता कसबा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता अखेर रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून पदवीधर मतदार संघात लढण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांची ही ईच्छा लक्षात घेता पक्षाने त्याची दखल घेतली असून शनिवारी (७ नोव्हेंबर) रुपाली पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाकडून दाखवण्यात आलेल्या विश्वासनानंतर उमेदवारी मिळाल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत  

News Desk

मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव

Aprna

5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली नवी तारीख जाहीर…!

News Desk