HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, अमेय खोपकरांनी अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई | “मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….” हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल, अशा खास शैलीत  मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. राज ठाकरे यांचा आज (१४ जून) वाढदिवस आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहाता राज ठाकरे कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करणार आहेत.

दरम्यान, “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही,” असे आवाहन राज ठाकरे यांनी शक्रवारी (१२ जून) ट्वीट करत मनसैनिका पत्राद्वारे केले होते.

दरम्यान, मनसे नेते  बाळा नांदगावकर यांनी ‘सुदामाचे राजधन’ अशी भावूक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाळा नांदगावकर म्हटले, “सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी “निष्ठा” जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे.

संबंधित बातम्या

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, राऊतांनी दिल्या राज ठाकरेंना शुभेच्छा !
बाळा नांदगावकरांनी ‘सुदामाचे राजधन’ भावूक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Related posts

विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली

News Desk

यशस्वी राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा नेता म्हणजे एम. करुणानिधी | ठाकरे

News Desk

लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची वर्णी लागणार ?

News Desk