HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, राऊतांनी दिल्या राज ठाकरेंना शुभेच्छा !

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ( १४ जून ) वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आपल्या खास शैलतील राज ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत ट्वीटमध्ये म्हटले, “वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र,.”

दरम्यान, “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही,” असे आवाहन राज ठाकरे यांनी शक्रवारी (१२ जून) ट्वीट करत मनसैनिका पत्राद्वारे केले होते.

संबंधित बातम्या

तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही | राज ठाकरे

 

Related posts

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk

‘तिहेरी तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणार

News Desk

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोना वॉरियर्सचा सन्मान, जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा !

News Desk