HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

बाळा नांदगावकरांनी ‘सुदामाचे राजधन’ भावूक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे यंदाचा वाढदिवस हा साधेपणाने कुटुंबासोबत साजरा करणार आहे. मनसे नेते  बाळा नांदगावकर यांनी ‘सुदामाचे राजधन’ अशी भावूक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बाळा नांदगावकर म्हटले, “सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी “निष्ठा” जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे.

बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट

“सुदामाचे राजधन”

सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी “निष्ठा” जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे. साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे “राजधन”. योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा “कृष्णकुंज”च आहे. या लॉक डाउन मुळे साहेबांना या दिवशी राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची या वर्षी ही प्रेमळ भेट होणार नाही व त्यामुळे सर्वांच्या मनात या वर्षी एकच ओळ नक्की असणार आहे…
” साहेबा प्राण तळमळला”
पण हा दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू.
आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन

“तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए”

संबंधित बातम्या

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, राऊतांनी दिल्या राज ठाकरेंना शुभेच्छा !

 

Related posts

बिहारमध्ये विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल असे वाटते काय? राऊतांचा भाजपला सवाल

News Desk

…तर देशातील जनतेचा भाजपावर विश्वास राहणार नाही। रामदेव बाबा

News Desk

पवारांची मुलाखत चोरूनही पाहिली नाही – उद्धव ठाकरे

News Desk