HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

अमित ठाकरेंनी घेतली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा गेले अनेक दिवस मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारची जबाबदारी आता चांगलीच वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज (२२ मे) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. आरोग्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘जेतवन’ येथे अमित ठाकरे यांची राजेश टोपे यांच्यासह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत विशेषतः ४ महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. अमित ठाकरेंनी या बैठकीत मांडलेल्या मुद्द्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळत आहे. अमित ठाकरेंच्या सूचनांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासनही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळते.

आरोग्यमंत्री आणि अमित ठाकरेंच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
  • राज्यात कोरोना आणि अन्य उपचारासांठी कार्यरत असलेल्या रुग्णालयांच्या बेड्सच्या क्षमतेबाबत स्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अॅप विकसित करावे.
  • बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करुन त्यांचे पगार पुन्हा आधी इतकेच करावेत.
  • राज्यातील प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत तातडीने अॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करुन देण्याची सोय करावी
  • प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित असावेत. त्याचप्रमाणे, या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकारनेच करावा.

अमित ठाकरेंनी यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील पत्र लिहून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांच्या पगारात कपात केली जाऊ नये, याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर, त्यांनी आज राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे.

Related posts

‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रश्मी ठाकरेंनी भाजपच्या ‘या’ नेत्यावर केली टीका

News Desk

दिवंगत हेगडेवारांवर माजी राष्ट्रपतींची स्तुती सुमन

News Desk

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात भाजप-शिवसेना पक्षांचे गोड कौतुक

News Desk