HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळांने घेतली पोलिसांची भेट

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी घेतलेल्या अटींवर आक्षेप नाही, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केले आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी काल (२८ एप्रिल) रात्री १६ अटीशर्तीसह परवानगी दिली. औरंगबादच्या सभेसाठी राज ठाकरे आज (२९ एप्रिल) दुपारी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. पुणे वाया औरंगाबादला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात बोलण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळांनी पावने दोन तास पोलिसांशी बैठक केली. या बैठकीनंतर नांदगावकरांनी बैठकीत झालेल्या तपशी दिला.

राज ठाकरेंची सभा होऊ नये म्हणून रिपलब्लिक युवा मोर्चाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे राज ठाकरेंची सभेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना नांदगावकर म्हणाले, “राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल झाली, यासंदर्भात प्रश्नविचारल्यावर ते म्हणाले, विरोध कोण करतोय मला माहिती नाही, आम्ही सर्वांनासोबत घेऊन जातोय. आता आम्ही शिवजयंती आणि आंबेडकर जयंती किती जल्लोषात साजरी केली. प्रत्येकाचे येणार सण आम्ही साजरा करत आहोत. ते लोक आपले आहेत, आपल्या घरातील लोकांशी काय भांडायचे. पोलीस सक्षम आहे आणि पोलिसांना सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. पोलीस हे प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत. आमची पोलिसांसोबत पावने दोन तास बैठक झाली. आम्ही पोलिसांसोबत छोट्या-छोट्या गोष्टीवर चर्चा झाली. आमच्या त्यांनी आणि आम्ही त्यांच्या सूचना स्वीकारल्या आहेत. ही बैठक योग्य प्रकारे पाडली आहे.

 पोलिसांनी घातलेल्या अटींना आमचा आक्षेप नाही

 राज ठाकरेंच्या सभेत पोलिसांनी जास्त अटी घातल्या आहे, यासंदर्भा आक्षेप आहेत का? घातल्यासंदर्भात नांदगावकर म्हणाले, पोलिसांच्या अटीवर आक्षेप नाहीत. सभेला उशीरा परवानगी दिल्यामुळे आणि प्रसार माध्यमांनी सभेसदर्भात उत्सुकता निर्माण केल्यामुळे किती लोक येणार हे माहिती नाही. आणि आज सायंकाळी ५ वाजता मनसेचे शिष्टमंडळ आणि पोलिसांची एक टीम सभेच्या ठिकाणची पहाणी करणार आहेत. लोकांच्या मनात राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता आहे. भाजप युती संदर्भात बोलताना म्हणाले, “आम्ही कुठे म्हणालो, युती करा आणि आमचा अजेंडा वेगळा आहे,असे नांदगावकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बीडमध्ये माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय?” – पंकजा मुंडे

Aprna

‘महाराष्ट्राचे मंत्री ११ दिवस गायब’ जनता वाऱ्यावर आहेचं पण मंत्र्यांना तरी शोधा!

News Desk

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

Aprna