HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज !

मुंबई । कोरोनाच्या काळात राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील या विविध क्षेत्रांतील संघटनांचे प्रतिनिधी, शिष्टमंडळ आपल्या समस्या, आपली गाऱ्हाणी घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारला उपरोधिक टोला लगावताना म्हटले आहे की, “समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28.” दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्याकडे आलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सत्तेतील मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांशी पत्रव्यवहार आणि संपर्क साधला आहे. त्यापैकी अनेक विषयांची राज्य सरकारकडून दखल घेतली गेली आहे.

राज ठाकरेंनी देखील यावरून मिश्किल टोला लगावत “मतं त्यांना द्या आणि समस्या घेऊन माझ्याकडे या” असे म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेला हात लावायचा नाही आमचं ठरलेलं आहे-  हसन मुश्रीफ

News Desk

‘ऐरे गैरे नथु खैरे’, जयदत्त क्षीरसागरांची पुतणे संदीप क्षीरसागरांवर टीका

Aprna

शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk