HW Marathi
Covid-19 HW एक्सक्लुसिव महाराष्ट्र राजकारण

‘जंबो हाॅस्पिटल आमच्या ताब्यात द्या‘ महाविकासआघाडी आणि भाजपवर रूपाली पाटील बरसल्या !

मुंबई | राज्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात ही संख्या वाढत चालली आहे. दरम्यान, पुण्यात रुग्णांची संख्या ही लाखांच्या पुणे गेली आहे. तसेच, ज्या गाजावाजात पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन केले. त्यावरुन आता अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. तिथे रुग्णांची दुरावस्था होताना दिसत आहे.

सध्या जम्बो हॉस्पिटल्च्या भोंगळ कारभारामूळे टीव्ही ९ मराठीचे पत्रकार पांडूरंग रायकर यांनी जीव गमावला. त्यानंतर तुम्ही जम्बो रुग्णालयात जाऊन मनसे स्टाईलने आंदोलन केले यावर काय सांगाल, असा प्रश्न रूपाली पाटील यांना विचारला असता त्यांनी, “मी काल (३ सप्टेंबर) जम्बो रुग्णालयात जाऊन आले. तिथे नेहमीप्रमाणे लोकांना अडवले जाते तशी मलाही अडवणूक करण्यात आली. मात्र, त्या रुग्णालयात काय होते हे कळायला हवे म्हणून मी मनसे स्टाईलने आत प्रवेश केला. मनपा, सरकार यांनी सगळ्यांनी भरघोस निधी देऊन हे कोव्हिड सेंटर उभारले आहे. परंतु तिथे सुविधांची वणवा आहे. तिथे डॉक्टर्स, नर्सेस नाहीत. आणि अशी भयाण परिस्थिती असताना जम्बो कोव्हिड सेंटर का उभे केले हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या पत्रकाराचा मृत्यू झाला त्यांच्यामूळेच या प्रश्नाला वाचा फुटली आहे. ज्या रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला त्याला प्रशासन जबाबदार आहे”, असेही रुपाली पाटील यांनी एट.डब्ल्यू मराठीशी बोलताना म्हटले.

पुणे मनपा ही भाजपकडे आहे तर राज्यशासन हे महाविकास आघाडी सरकारकडे आहे. या दोघांच्या तू तू मै मैमध्ये पुणेकरांचे हाल होत आहेत असा थेट आरोप रुपाली पाटील यांनी भाजप आणि राज्य सरकारवर केला. पुण्यात स्मार्ट सुविधांच नाही. भाजपला लोकांपर्यंत सुविधा पोहोचवता येत नाही तर तुम्हाला अधिकार आहे का सत्तेत राहण्याचा? असा प्रश्नही रुपाली पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे. लोकांचा जीव का जात आहे याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.इतकचं नाही तर पुण्याच्या महापौरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असंही त्यांनी म्हटलं.आणि जर सरकार आणि पुणे मनपाला जंबो हाॅस्पिटल सांभाळणं शक्य नसेल तर त्यांनी आमच्या ताब्यात द्याव आम्ही ते असंही त्यांनी म्हटलं.

 

 

Related posts

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांचा राजीनामा

News Desk

काँग्रेस नेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

News Desk

बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही

News Desk