HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत !, ‘मनसे’कडून ‘शिवसेने’ची कोंडी

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता मनसेकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. “महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे”, असे विधान संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राऊत थेट राज्यपालांना वाकून कोपरापासून नमस्कार करत आहेत. तर या फोटोसोबत ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’, असं कॅप्शन देऊन मनसेकडून राऊतांना टोला लगावण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी काहीच दिवसांपूर्वी विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर, राज्यपालांनी याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यास सांगितले. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले कि, “महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील सरकार हे लोकनियुक्त आहे. त्यामुळे कोणतीही समस्या वा कोणत्याही प्रश्नासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आणि त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणे अपेक्षित आहे. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत”.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकजवळच्या भीषण अपघातात दोघे ठार

News Desk

अभिनेत्री मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला, पती राज कौशल यांचे झालं निधन

News Desk

पोलिस उप-अधीक्षक विशाल ढुमे पाटलांना कारने उडवण्याचा प्रयत्न

swarit