HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार, कार्यकर्त्यांनी हाती बांधले शिवबंधन

ठाणे | एकीकडे अर्थसंकल्पाची धामधूम सुरु असताना, इकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना प्रवेशाची रेलचल पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या डोंबिवलीतील बड्या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे कल्याण तालुक्यातील माजी अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

अर्जुन पाटील यांच्यासह डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी सेना पदाधिकारी सागर जेधे यांनीही प्रवेश केला.”जे शिवसेनेत आले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत. शिवसेनेची ताकद कल्याण डोंबिवलीत आहेच ती आता अधिक वाढते आहे. महाराष्ट्रातही ही ताकद वाढत आहे. शिवसेनेच्या भगव्या खाली एकत्र येत आहेत. या सर्वांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वाव या सर्व तरुणांना दिला जाईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Aprna

पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे! – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna

“तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?”, चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk