HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे ५० पदाधिकारी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला, कार्यकारिणीत बदल होण्याचे संकेत

मुंबई | राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. अशात आता मनसेच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेचे ५० पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. यामध्ये तब्बल ५० पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. मनसे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत नव्या वर्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्यामुळे ही तातडीने बैठक घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. या बैठकीत महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर आता राज ठाकरे हे लवकरच नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यासंबंधी नाशिकचे मनसे सचिव पराग शिंत्रे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे मनसेच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेत्यांच्या घरी झाले बाप्पा विराजमान!

News Desk

शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी २ कोटी मागितले!

News Desk

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; ८ सुवर्णासह ३० पदकांची कमाई

News Desk