HW News Marathi
देश / विदेश

#Ayodhya : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राज ठाकरेंनी केले मोदींचे अभिनंदन

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकर सुरू करणार असल्याचे आज (५ फेब्रुवार) सकाळी लोकसभेत सांगितले. मोदी लोकसभेत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांन पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्वीट करत मोदींचे अभिनंदन केले आहे.

राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटले की, “केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन. हॅशटॅग अयोध्या,” असे लिहिले आहे.

‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री’ असे केल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

निवडणुकांच्या तोंडावर कन्नडींगांचे भाषाप्रेम जागे

News Desk

भारताकडून मिसाईल हल्ला होईल याची आम्हाला भीती होती !

News Desk