HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचा अठ्ठाहास कशासाठी आणि कोणासाठी ?, राज ठाकरेंचा पत्रातून राज्यपालांना सवाल

मुंबई | कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे.   राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलगुरू आहेत. त्यामुळे हे पत्र आपणास उद्देशून लिहित आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहाता विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचा अठ्ठाहास कशासाठी आणि कोणासाठी ?,  पत्रातून राज ठाकरेंनी राज्यपालांच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्याच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थितकेले आहे.

या पत्रात राज ठाकरेंनी म्हणाले, कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती भीषण आहे. गेल्या  दोन महिन्यापासून देशात टाळेबंदी आहे. तर राज्यातील मुंबई आणि पुणे येथील परिस्थिती पाहा हा भाग किती दिवस टाळेबंदी मध्ये राहिली हे सांगता येत नाही. आणि यांचे भाकीत देखील करू शकत नाही.टाळेबंदी शिथिल झाली याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही, हे आपण देखील जाणता. अशा परिस्थिती परिक्षा घेण्याचा अठ्ठाहास कशासाठी आणि कोणासाठी ?, असा सवाल त्यांनी राज्यपालांना केला आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव किती जबरस्त हे तुम्ही जाणता, असे मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्यने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घरा बाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आणण्यामागचे प्रयोजन काय ?, टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे होणारे अपरिनियमित नुकसान जाणून देखील देशाने इतकी मोठी टाळेबंदी झालेली का तर जीव वाचला तर पुढे सगळे शक्य आहे. मग ह्याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करू परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?

परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांना पास करणे असे होत नाही. अधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा त्यांना काही प्रोजेक्ट्रस देऊन किंवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या अंतिम परिक्षेचा निकाल जाहीर करता येईल, असे राज ठाकरे यांनी पत्रातून राजपालांना सांगितले आहे.

 

Related posts

चिंताजनक ! देशातील कोरोना बळींचा आकडा १ लाखाच्या पार 

News Desk

शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला !

News Desk

राज्यपालांनी राजभवनाच्या बाहेर येत राजकारण करावे – संजय राऊत

News Desk