मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. अध्योध्या दौरा तुर्तास पुढी ढकलल्याची माहिती राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. राज ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे ५ जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. नुकतेच राज ठाकरे हे तब्येतीच्या कारणामुळे पुणे दौरा अर्थवट सोडून मुंबईला आले होते. तसेच अयोध्या दौरा पुढे ढकलल्याची माहिती तर दिलीत. त्याचबरोबर पुण्यात २२ मे रोजी सभा होणार असल्याची घोषणा त्यांनी केला आहे. पुण्यातील राज ठाकरेंची सभा ही गणेश कला क्रीडा केंद्र येथे सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज ठाकरे तब्येतीच्या कारणाने पुणे दौरावरून परत आले. त्यामुळे पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार की नाही यावर चर्चेला उधारण आले होते. परंतु, आज राज ठाकरेंनी ट्वीट म्हटले, “अयोध्या दौरा तुर्तास स्थगित! महाराष्ट्र मनसैनिकांनो, या! रविवारी २२ मे रोजी सकाळी १० वाजता. स्थळ, गणेश कला क्रीडा केंद्रा, पुणे.” असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यांची घोषणा केल्यापासून उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांनी विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी बृजभूषण सिंग यांनी माध्यमांद्वारे केली होती. आणि राज ठाकरेंना अयोध्यात रोखण्यासाठी त्यांनी रॉली काढली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.