HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकत्र: खा. शरदचंद्र पवार

उत्तम बाबळे

नांदेड :- विधानसभा निवडणुकीच्यावेळी तुटलेली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडी जुळविण्याच्या निर्णयाचा योग आज नांदेड येथे माजी मुख्यमंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी आणला असून महाराष्ट्र राज्यातील सर्वच महापालिका व जिल्हापरिषदेत कॉंग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही निश्चितच आघाडी करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.डाॅ.शरदचंद्र पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.डाॅ.शरदचंद्र पवार हे २६ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वारातीमवि ची मानद डी.लिट् पदवी स्विकारण्यासाठी आले असता खा.अशोक चव्हाण यांनी त्यांना फराळाचे निमंत्रण दिले.त्याच अनुशंगाने खा.डाॅ.शरदचंद्र पवार यांनी कै.डाॅ.शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट दिली.यावेळी काँग्रेसचे खा.अशोक चव्हाण,माजी मंत्री आ.डी.पी.सावंत,आ.अमरनाथ राजूरकर,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर,राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा.आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर,माजी मंत्री कमलकिशाेर कदम,आ.प्रदिप नाईक,माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांसह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीअंती कॉंग्रेसचेप्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा परिषदेतील सत्तास्थापने बाबत चर्चा करुन काँग्रेस पक्षाचे २८,भाजपाचे १३,रा.काँ.पार्टीचे १०,शिवसेनेचे १०,रा.स.प.चा १ व अपक्ष १ अशा ६३ जि.प.सदस्यांचे संख्याबळ असल्याची माहीती दिली.आणि काँग्रेस व रा.काँग्रेस ची आघाडी झाली तर नांदेड जि.प.वर आघाडीचीच सत्ता स्थापण होऊ शकते असे सांगून राज्यात सर्व ठिकाणी आघाडी करावी अशी विनंती केली.qझालेल्या चर्चे बाबद खा.डाॅ.शरदचंद्र पवार यांच्याशी विचारले असता ते म्हणाले की,खा.अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आघाडी विषयी प्रार्थमिक चर्चा झाली आहे.मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो, तो निर्णय लवकरच जाहीर करु. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवडणुकांनंतरचे वर्तन पाहता ते सत्तेतून बाहेर पडतील, असे वाटत नाही. पण बाहेर पडले तर मध्यावधी निवडणुकांना जाण्यासाठी सज्ज आहोत, असेही सांगण्यास पवार विसरले नाहीत. आघाडी होण्यासाठी अनुकूल परिस्थीती असल्याचे निदर्शनास आले असून खा.डाॅ.शरदचंद्र पवार यांनी आघाडीसाठी तुर्तास तरी हिरवी झेंडी नांदेड मध्ये दाखविली आहे. दरम्यान, मुंबईत राष्ट्रवादी कुणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.आघाडी झालीच तर राज्यातील १७ ते १८ जिल्हापरिषदेत आघाडीची सत्ता स्थापण होईल असे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीने मुंबईत ९ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष आहे. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. भाजप आणि शिवसेनेत दोन जागांचा फरक आहे.पण शिवसेनेने कांही अपक्ष मिळविल्याने त्यांचा आकडा वाढवला आहे. मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादीची भूमिका आहे.शिवसेनेकडून उमेदवारांची जुळवाजुळव केली जाईल, पण वेळ आलीच तर पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे संकेतही खा. डाॅ.शरदचंद्र पवार यांनी दिले आहेत. मुंबईत भाजपचे ८२, तर शिवसेनेचे ८४ उमेदवार निवडून आले आहेत.मात्र शिवसेनेला ४ अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आता ८८ झाले आहे. तर राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकही महत्वाची भूमिका बजावू शकतात.दरम्यान कॉंग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले असले, तरी त्यांनी भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.यामुळे राज्यात काँग्रेस व रा.काँ.पार्टीची आघाडी सत्तास्थापनेसाठी दरम्यानच्या काळात होऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरे असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिलं असतं- राज ठाकरे

News Desk

“…तर संसार मोडला, गिरीश महाजन यांची गुलाबराव पाटलांच्या घरी लग्नसोहळ्यात खंत”

News Desk

पुण्यात पीएमपीएल बस पुलावरून कोसळली

News Desk