HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती

मुंबई | राज्य सरकारने भोंग्यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. भोंग्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले दिसत आहे.  या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. मनसेच्या वतीने बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभरातील सर्व मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिले आहे. या पार्श्वभूमीवर भोंग्यासंदर्भात नवे नियम केले असून आज (२५ एप्रिल) सर्वपक्षीयांशी चर्चा करून मार्गदर्शक तत्त्वे ठरवणार आहे. 

या बैठीकत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. इतर अन्य काही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात राज्यातील मशिदीवरील भोंग्याचा मुदा उपस्थित केला आहे. यानंतर हनुमान जंयती निमित्ताने पुण्यात हनुमान मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाची पुजा करण्यात आली. आणि यावेळी हनुमान चालिसाचे पठण देखील करण्यात आले. 

दरम्यान, आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी २३ एप्रिलला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्य २२ एप्रिललाच मुंबई दाखल झाले होते. यानंतर मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिलला राणा दाम्पत्याना शिवसैनिकांनी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडून दिले नाही. यामुळे राणा दाम्पत्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला. राणा दाम्पत्याना मुंबई पोलिसांनी त्या दिवशी सायंकाळी अटक केले आणि काल (२४ एप्रिल) वांद्रे न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने राणा दाम्पत्याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

Related posts

भाईंदर मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव देणार | मुख्यमंत्री

swarit

१५ हजार लाच घेताना रंगे हात अटक

News Desk

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली 

News Desk